Dhule ZP Election | धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व; आतापर्यंत पाच जागांवरती फुललं कमळ ! SaamTV
महाराष्ट्र

Dhule ZP Election | धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व; आतापर्यंत पाच जागांवरती फुललं कमळ!

भाजपला बहूमतासाठी दोन जागा हव्या होत्या मात्र भाजपला आता दोनपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकी Dhule ZP Election मध्ये भाजपला बहूमतासाठी दोन जागा हव्या होत्या मात्र भाजपला BJP आता दोनपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आत्ताच जाहीर केलेल्या निकालानुसार भाजपने जवळपास पाच जागांवरती आपले कमळ फुलवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपचेच वर्चस्व दिसत असून आता धुळे जिल्हा परिषद जवळपास भाजपच्याच ताब्यात पुन्हा गेल्याचे दिसून येत आहे. (BJP dominates in Dhule Zilla Parishad)

हे देखील पहा -

धुळे तालुक्यामध्ये भाजपने दहा जागांपैकी दोन जागांवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. शिंदखेडा Shindkheda तालुक्यात देखील तीन जागांवर भाजपला वर्चस्व मिळवता आले आहे. शिंदखेडा तालुक्यात चार गटांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी तीन जागांवर भाजप ने विजय मिळवला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीने NCP विजय मिळवला आहेत या ठिकाणी शिंदखेडा तालुक्यातील चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकी दरम्यान भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल Jayakumar Rawal यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती परंतु 4 पैकी 3 जागा मिळवत रावल यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असल्याचे निकालांमधून दिसून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT