Devendra Fanavis uddhav thackeray Saam Tv
महाराष्ट्र

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Devendra Fanavis : देवेंद्र फडणवीस यांनी महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला

संजय डाफ

नागपूर : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajyasabha Election) उमेदवारीवरून राजकारण तापलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐनवेळी शिवसेना कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेवरून मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. (BJP Devendra Fadnavis Latest Statement)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपुरात माध्यमांसोबत बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा सर्व विषय सुरू केला, त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळ्या प्रकारचा विषय झाला आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. पण तो त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

महागाईवरून पवारांवर टीका

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. “सर्वात आधी पवार साहेबांनी याचं उत्तर द्यायला हवं की, पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर २९ रुपये आणि केंद्राचा कर १९ रुपये. राज्याचा कर का कमी करत नाही. महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहेत. २९ रुपये कर पेट्रोल डिझेलवर लावून हे लोक महागाईवर बोलू कसे शकतात. याचं मला आश्चर्य वाटतंय”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

Healthy Chapati : गव्हाची चपाची पौष्टीक करण्यासाठी खास टिप्स, मुलांच्या टिफीनसाठी खास रेसिपी

SCROLL FOR NEXT