BJP 
महाराष्ट्र

नगराध्यक्षांच्या पतीची काँग्रेसशी जवळीक; भाजपने केली हकालपट्टी

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया बोन्द्रे यांचे पती कुणाल बोन्द्रे यांची आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केली. चिखली भारतीय जनता पक्षाचे शहाध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी कुणाल बोन्द्रे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले.

पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप, पक्ष कार्यात अनियमितता यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत असल्याचा ठपका कुणाल बोन्द्रे यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. गत पाच वर्षांपूर्वी प्रिया बोन्द्रे व कुणाल बोन्द्रे भाजपात आले होते. भाजपाने त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन मोठया मताधिक्याने विजयी केले.

प्रिया बोन्द्रे भाजपच्या चिन्हावर नगराध्यक्षा झाल्या पण त्यांच्या पतीची काँग्रेसशी असलेली जवळीक देखील वाढू लागली. त्यामुळे भाजपात अनेक दिवसांपासून असलेली अस्वस्थता अखेर त्यांच्या हकालपट्टी करुन काही प्रमाणात थांबविण्यात आली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT