शशिकांत शिंदे! संजय राऊतचा किस्सा माहिती आहे ना? साेमय्या

kirit somaiya
kirit somaiya
Published On

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या माफियांनी यापुर्वी अनेक वेळा धमक्या दिल्या, हल्ले केले. या धमक्यांना मी भीक घालत नाही असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट साेमय्या kirit somaiya यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिले. सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीला आव्हान देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. त्यावर किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारवाई हाेईल असा दावा त्यांनी केला. kirit-somaiya-on-shashikant-shinde-says-no-scared-of-enforcement-directorate-jarendeshwar-sugar-factory-satara-news-sml80

साेमय्या म्हणाले हे घोटाळेबाज शेतकऱ्यांना डुबवत आहेत. बेनामी कारोबार करतात आणि चोरी लबाडी करून धमक्या देतात अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांनी चोरी केली आहे, त्यांना जाब द्यावाच लागणार. हे कोण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला धमकी देतात आमदार नामदार. कोर्टाने सांगितले जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे आणि ती होणारच.

kirit somaiya
चपला शिवणाऱ्याचा प्रामाणिकपणा; जयस्वालांचे ४४ हजार परत केले

पहिले घोटाळ्याचा हिशोब द्या, घोटाळ्यांचे पैसे महाराष्ट्राला जनतेला परत करा. घोटाळेबाज ठाकरे पवार साहेब यांचे माफिया घोटाळे करतात. महाराष्ट्राच्या जनतेला लुटत आहेत आणि नंतर धमक्या देतात. घोटाळ्यांचा पैसा महाराष्ट्राला परत करावाच लागणार असे साेमय्या यांनी नमूद केले.

दरम्यान महाराष्ट्रातील साडे बारा काेटी जनतेला लुटण्याचे काम बंद करा. त्यांचा गृहमंत्री गायब आहे. त्यांचे पाेलिस अधिकारी गायब आहेत. त्यांचे पाेलिस जेलमध्ये आहेत. हे सुपारी बाजारांचे सरकार आहे. हे माफिया आणि डाकू आहेत. त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केलीच ना. ईडीला घाबरत नाही असे म्हणणारा संजय राऊत मागच्या दाराने ५५ लाख रुपये देऊन आला.

ईडीला घाबरत नाही म्हणणारे अजित पवार हे किती खाेटे बाेलतात हे जनतेला समजले आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांनी चाेरला. अजित पवार बहिणीच्या नावे बेनामी व्यवहार करीत आहेत. आम्ही घाबरत नाही असे म्हणणा-यांना लाच नाही वाटत का ? असा प्रश्न साेमय्यांनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या सूचनेनूसार या कारखान्यांची चाैकशी सुरु आहे. एनसीपी आणि सेना हे दाेन माफिया एकत्र आले असून घाेटाळेबाजांना सरळ केल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही साेमय्यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com