Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कॉन्फिडन्स वाढला! हरियाणाच्या विजयानं भाजप आक्रमक; राज्यातही पुन्हा महायुती सरकार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Girish Nikam

हरियाणात काँग्रेसच्या विजयाचे दावे सातत्याने केले जात होते. राहुल गांधी स्वतः या निवडणुकीत खूप सक्रिय होते. सगळ्या एक्झिट पोलचे अंदाजही काँग्रेसच्या बाजूने होते. पण काँग्रेसचा पराभव झाला. भाजपनं अनपेक्षित विजयाची हॅटट्रीक केली आहे. या विजयामुळे महाराष्ट्रात लोकसभेत पिछेहाट झालेल्या आणि खचलेल्या महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय.

'हरियाणा तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है' असे बॅनर लावत मुंबईत भाजपने जल्लोष केला. राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर पहिली विजयी सलामी हरियाणाची, दुसरी महाराष्ट्र देणार असा निर्धारच फडणवीसांनी केला.

लोकप्रिय योजना महायुतीला तारणार?

मध्यप्रदेश विधानसभेला जादूची कांडी ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातही राबवत महायुतीनं मतदारांना आपलसं केलं आहे. त्याशिवाय 'अन्नपूर्णा' या योजनेतंर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. तसेच 'वयोश्री' योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

दुसऱ्या बाजूबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तर धनगर आरक्षणावरूनही राजकारण पेटलं आहे. त्यामुळे हे मुद्दे कुठेतरी महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राज्यातील वाढती गुन्हेगारी, लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरुन सरकार विरोधात जनतेत रोष आहे.

महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोदी-शाह आणि राहुल गांधींचे राज्यात दौरे वाढले आहेत. या राजकीय संघर्षात जनतेच्या मनात कोण लाडके आणि कोण सावत्र आहे, हे निकालानंतरच कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Garba King Video : गरबामुळे हार्ट अटॅकचा धोका? मुलासोबत खेळता खेळता अचानक गेला जीव, VIDEO

Fact Check : डासांना मारणाऱ्या कॉईलचा धूर आरोग्यासाठी घातक? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Maharashtra Politics : शरद पवारांचे भाजप-अजितदादांना धक्के; विधानसभेसाठी काय आखली रणनीती? VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

SCROLL FOR NEXT