chandrapur news Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

chandrapur mayor post : काँग्रेस मोठा पक्ष ठरल्यानंतरही चंद्रपूरमध्ये सत्तेचा पेच निर्माण झालाय.. मात्र हा पेच नेमका काय आहे ? महापौरपदाचा चेंडू मातोश्रीच्या कोर्टात कसा दाखल झालाय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

चंद्रपूर महापालिकेचा निकाल लागला... काँग्रेस सगळ्यात मोठा पक्षही ठरला.. मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे चंद्रपूरच्या महापौरपदाचा पेच निर्माण झालाय... त्यातच भाजपनं काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.... भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी तर काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिलीय...तर वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळून लावलाय..

दुसरीकडे ठाकरेसेनेनंही थेट चंद्रपूरच्या महापौरपदावर दावा सांगितलाय.. त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी थेट ठाकरेंच्या मातोश्रीचं दार ठोठावलंय.. उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा केल्यानंतर अडीच वर्षांच्या महापौरपद आणि स्थायी समिती असा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय.

चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत.. तर बहुमताचा आकडा 34 आहे.. मात्र निवडणुकीत सर्वाधिक 27 जागा काँग्रेसनं पटकावल्या आहेत... तर भाजप 23, ठाकरेसेना 6, वंचित 2, अपक्ष 2 आणि इतर 6 विजयी झालेत...

मात्र अपक्षांसह काँग्रेसचं संख्याबळ 30 पर्यंत पोहोचलंय.. ठाकरेसेना आणि वंचित आघाडीचं संख्याबळ काँग्रेसच्या 2 बंडखोरांसह 10 इतकं झालंय... त्यामुळे ठाकरेसेना आणि वंचितला सोबत घेतल्यास काँग्रेसचं संख्याबळ 40 पर्यंत जातंय..

दुसरीकडे भाजप अँटी काँग्रेस आघाडी उभी करण्यासाठी ठाकरेसेना वंचित आघाडीच्या 10 नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे... त्यामुळे वंचित आणि ठाकरेसेनेचे नगरसेवकांसोबतच अपक्ष गळाला लागल्यास आणि भाजपला 34 जागांसह काठावरचं बहुमत मिळेल.

खरं तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यानं सत्तास्थापनेची पूर्ण संधी आहे.. मात्र महापौरपदावरुन वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात संघर्ष रंगला...आणि धानोरकरांनी थेट 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत स्वतंत्र गट स्थापन केला.. आता याच काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे... मात्र वडेट्टीवारांनी ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे काँग्रेसला साथ देणार की महापौरपद मिळवण्यासाठी भाजपला... याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT