Wardha Saam TV
महाराष्ट्र

Wardha : अन् भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीचे भाषण सुरु होताच लागले गो बँकचे नारे; नेमकं प्रकरण काय?

Lok Sabha Election : भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीचे भाषण सुरु होताच नागरिक तेथून उठून गेले. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यासामोर भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीला आपलं मत मांडावं लागलं.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News :

वर्ध्यामध्ये भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीचे भाषण सुरु होताच गो बँकचे नारे लागले आहेत. श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित प्रमुख उमेदवार एकाच मंचावरील कार्यक्रमात हा प्रकार घडलाय. कार्यक्रमाला इंडिया आघाडी, वंचित आघाडी व बसपाच्या उमेदवारांची देखील उपस्थिती होती.

या कार्यक्रमात भाजप उमेदवाराने देखील आपला प्रतिनिधी पाठवला होता. भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीचे भाषण सुरु होताच नागरिक तेथून उठून गेले. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यासामोर भाजप उमेदवाराच्या प्रतिनिधीला आपलं मत मांडावं लागलं.

वर्धेत श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वर्धा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता प्रमुख उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे उमेदवार अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रवींद्र साळुंके, बसपा उमेदवार मोहन राईकवार यांची उपस्थिती होती.

तर भाजप उमेदवार रामदास तडस यांनी आपला प्रतिनिधी म्हणून मिलिंद देशपांडे यांना पाठविले होते. या कार्यक्रमात इतर उमेदवारांनी आपली मत मांडत पुढील दिशा वर्धेकरांसमोर ठेवली पण भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी भाषणासाठी उभे राहताच नागरिकांनी गो बँकचे नारे लावत कार्यक्रमातून उठून गेले. अखेर भाजप प्रतिनिधीला मोजक्या लोकांसमोरच आपली भूमिका मांडावी लागली.

वर्धेच्या न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते विजय जावंधीया होते तर कार्यक्रमाला वर्धेकर जनताही आपल्या भावी खासदारच काय व्हिजन आहे, हे एकण्यासाठी उपस्थित होती.

उमेदवारांची भाषणं सुरु झाली आपली मत मांडत निवडून आल्यास आपण काय करणार हे सांगण्यात आले. पण भाजप उमेदवार यांनी हजर न राहता आपला प्रतिनिधी पाठवला. प्रतिनिधीचे भाषण सुरु होताच नागरिकांनी गोंधळ घालायला सुरवात केली.

मागील दहा वर्षात रामदास तडस यांनी काय केल, कोणती कामे केली याचा जाब विचारायला सुरवात करत नागरिकांनी गो बँकचे नारे लावायला सुरवात केलीय. आयोजकांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण नागरिकांनी आपला गोंधळ सुरु ठेवत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT