Shivsena Vs BJP Saam TV
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाने ज्यांच्याशी युती केली त्यांना दगा दिला; भास्कर जाधवांचे टीकास्त्र

शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे, कोणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये - जाधव

अमोल कलये

रत्नागिरी: संभाजी ब्रिगेड प्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र एकासोबत कायम राहिली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं आहे.

शुक्रवारी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना (Sambhaji Brigade and ShivSena) एकत्र काम करणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या या भूमीकेवर भाजपने जोरदार टीका केली होती. उपमुख्यमंत्री यांनी देखील या युतीवर बोलताना विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका केली होती.

पाहा व्हिडीओ -

याच सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला, जाधव म्हणाले, ' संभाजी ब्रिगेड प्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र एकसोबत कायम राहिली.

ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला, शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं. शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष असून ५६ दसरा मेळावा घेण्याच्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला, एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष हा शिवसेना असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे, कोणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल. शिवसेनेच्या नादाला लागू नका असा इशाराही त्यांनी यावेळी शिवसेनेच्या विरोधकांना दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT