BJP announces Yuva Morcha National Executive Saam Tv
महाराष्ट्र

BJP News: मोठी बातमी! भाजपकडून युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर, महाराष्ट्रातील ३ नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP announces Yuva Morcha National Executive: भाजपकडून मंगळवारी युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ३ नेत्यांचा समावेश आहे.

Priya More
  • भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

  • महाराष्ट्रातील तीन नेत्यांना भाजप युवा मोर्चात मोठी जबाबदारी

  • सायली कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती

  • सांगलीचे वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला

गणेश कवडे, मुंबई

भाजपने युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. सात तरुण नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणि इतर तिघांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि वडोदराचे खासदार हेमांग जोशी यांनी पक्षाच्या युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील ३ नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी मंगळवारी जारी करण्यात आली. महाराष्ट्रातील तिघांचा भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सायली कुलकर्णी यांची भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच, महाराष्ट्रातील सांगलीतील वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या सायली रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला पक्षाच्या राष्ट्रीय संघटनात्मक पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील युवा नेत्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. यामध्ये सांगलीतील वीरेंद्र पृथ्वीराज पाटील आणि मुंबईतील गुरदित सिंह वोहरा यांचीही नावे आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये विविध राज्यांतील युवा नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव तसेच माध्यम आणि सोशल मीडिया विभागांसाठीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सात नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे आमदार शगुन परिहार आणि बंगालचे आमदार सौमेन कर्फा यांचा समावेश आहे. इतर नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे निखिल मणी तिवारी, नागालँडचे अरविंद दमानी, तेलंगणाचे मलोथ कोमाली नाईक, बिहारचे राजेंद्र सिंह आणि छत्तीसगडचे भूपेंद्र नाग यांचा समावेश आहे. भाजपने बिहारच्या आमदार आणि प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांची युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांच्यासोबत विविध राज्यांतील ३३ जणांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगड पर्यटकांनी गजबजले! अलिबागमध्ये दोन दिवसांत २० हजार पर्यटकांची हजेरी

Diwali 2026 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रडल्यास संपूर्ण वर्षभर भोगावे लागते दुःख? जाणून घ्या यामागचे सत्य

SCROLL FOR NEXT