BJP announces pledge for Kolhapur North Assembly by-elections Twitter/@BJP4Maharashtra
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचा वचननामा जाहीर

North Kolhapur Assembly By Election Latest News: कॉंग्रेसकडून या मतदार संघात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीसाठी भाजपने वचननामा जाहीर केला आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्यासह भाजपचे (BJP) अनेक नेते उपस्थित होते. कोल्हापूर (Kolhapur) उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक (By Election) होत आहे. गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. कॉंग्रेसकडून या मतदार संघात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP announces pledge for Kolhapur North Assembly by-elections)

हे देखील पहा -

जाहिरनामा (Manifesto) प्रसिद्ध केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तर जिंकल्यानंतर विमानतळाचा आढावा घेतला जाईल. या विमानतळावर मोठी विमान उतरल्याशिवाय जिल्ह्याची उद्योगिक प्रगती होणार नाही. विमानाने शेती माल पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावत पाटील म्हणाले की, शाहू जन्मस्थळाचं सगळं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे मंत्री सतेज पाटील याच्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, बंटी पाटलांना कधी कुटुंब कळलंच नाही, भाजप एक कुटुंब आहे इथं एखाद्याच्यात लग्न ठरलं की आम्ही जातो, ही निवडणूक म्हणजे एक लग्नच आहे असं ते म्हणाले. कोल्हापूर मधला सेनेचा हिंदुत्ववादी मतदार हातावर शिक्का मारण्याची सवय झाली तर यो परत येणार नाही हे लक्षात आलं तर मातोश्रीवरून योग्य आदेश येईल असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपचे जाहिरानाम्यातील मुद्दे -

- के एम टी बस वाहतूक सुधारणेसाठी पाठपुरावा करणार

- CNG, इलेत्रिक बससाठी पाठपुरावा करणार

- बास्केट ब्रिज करणार

- पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी पाठपुरावा करणार

- रंकाळा तलावाच्या पुर्नजीवन आणि सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणार

- खेळाची मैदानाचा विकास करणार

- क्रीडासंकुल विकसित करणार

- पर्यटकांसाठी संकुल करणार

- आरोग्य सुविधा बळकट करणार

- शहरातील सर्व मिळकतधारकांना प्रॉपर्टीकार्ड देणार

- रस्ते नव्या अर्बन डिझाइननुसार होण्यासाठी आग्रह

- चौकांचे सुशोभीकरण करणार

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने साथ सोडली, 'घड्याळ' हाती बांधलं

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT