- विनायक वंजारे
Kankavali : कणकवलीतील कनेडी गावात आज (मंगळवार) भाजप आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांत राडा झाला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) पूर्व संध्येला कणकवलीत (kankavali) राजकीय तणाव निर्माण झाला आहे. कनेडी गावात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
आज सकाळी नितेश राणे (Nitesh Rane) समर्थक भाजप पदाधिकारी व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेवून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर कनेडी बाजारपेठेत तुफान राडा झाला. यावेळी दाेन्ही गटाची मारामारी देखील झाली.
यावेळी शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले. या मारामारीची माहिती पाेलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी परिस्थीती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव आक्रमक झाला हाेता.
या जमावाला पांगविण्यासाठी पाेलिसांनी आक्रमक भुमिका घेतली. त्यावेळी काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कणकवलीचे पोलीस (police) निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलीसांची मोठी कुमक मागवण्यात आली. तरीही भाजप कार्यकर्ते आक्रमक होते. त्यात काही महिलांचा देखील समावेश हाेता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी कनेडी बाजारपेठेत तणावाचे वातावरण आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.