nanded , bajar samiti election, naygoan bajar samiti election saam tv
महाराष्ट्र

Naygoan Bajar Samiti Election News : नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविराेध; भाजप, काँग्रेसच्या दिलजमाईची चर्चा

या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान हाेणार हाेते.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Naygoan Market Committee Election News : नांदेड जिल्ह्यातील नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविराेध पार पडली. यंदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अगदी उमेदवारांच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांतील नेत्यांचा कस लागल्याचे दिसून आले. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून प्रशासकीय संचालक मंडळ असलेल्या नांदेडसह भोकर, नायगाव, कुंटूर आणि हिमायतनगर या पाच बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणुक लागल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले हाेते.

नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले हाेते. या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिलला मतदान हाेणार हाेते. तर २९ एप्रिलला निवडणूकीचा निकाल जाहीर होणार हाेता मात्र त्यापुर्वीच नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व संचालक बिनविराेध निवडून आले आहेत.

या निवडणुकीत आमनेे सामने आलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवरांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी आपल्या तलवारी म्यान केल्याचे पाहयला मिळाले. काँग्रेसने 10 जागा तर भाजपाने 06 जागांवर तडजोडी करून ही निवडणूक बिनविरोध काढली आहे. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेस सोबत हातमिळवणी केल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीवरून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

SCROLL FOR NEXT