Congress and BJP alliance
Congress and BJP alliance  Saam Tv
महाराष्ट्र

भंडाऱ्यात काँग्रेसची भाजपसोबत युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा : देशात महागाईच्या मुद्यावरून काँग्रेस आणि अन्य पक्षांकडून भाजपविरोधी भूमिका घेतली जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राज्यात नाना पटोले भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेत आहेत. महागाईच्या मुद्यावरून देशासहित राज्यातील अनेक काँग्रेस नेते भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच देशातील अनेक काँग्रेस नेते पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधी भूमिका घेत असताना भंडाऱ्यात काँग्रसने (Congress) जिल्हा परिषदेत भाजपच्या (BJP) गटासोबत युती केली आहे. या विचित्र युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Bhandara Latest Political News in Marathi )

देशासहित अनेक राज्यात काँग्रेसची स्थिती कमकुवत होत आहे. यामुळे पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात पक्षवाढीसाठी सोनिया गांधींनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेमंडळी पक्ष मजबूत करण्यासाठी बैठका, शिबीर घेऊन मेहनत घेताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपने सत्तेसाठी हातमिळवणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भंडाऱ्यात काँग्रेसने भाजपच्या एका गटासोबत युती केली असून जिल्हा परिषदाच्या अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे संदीप ताले यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भंडाऱ्यात भाजपचे एकूण १२ सदस्य निवडून आले तर काँग्रेसचे २१ सदस्य निवडून आले आहेत. भंडाऱ्यात (Bhandara) भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकटे पाडले आहे. मात्र, सत्तेसाठी केलेल्या युतीची राज्यभर चर्चा सुरु आहे.

दरम्यान, भंडाऱ्यात या निवडणुकीत भाजपचे १२, काँग्रेस २१, राष्ट्रवादी काँग्रेस १३, बसपा १ , शिवसेना १, वंचित बहुजन आघाडी १ आणि अन्य पक्षाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. राज्यात भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

SCROLL FOR NEXT