जालणा : ST नसती तर माझं शिक्षण झालं नसतं. परिवहन महामंडळाचा (Transport Corporation) आर्थिक कारभार डबडबाईस आला आहे. एसटी कर्मचारी करत असलेला संप योग्यच असून ST कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी राज्य सरकारकडून संप मोडून काढण्याची भाषा अयोग्य आहे.
हे देखील पहा -
सध्या भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या (BJP ST Employees) संपाला पाठिंबा देत आहे मात्र त्यांच्या काळात देखील त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला होता असा टोलाही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी भाजपला हाणला आहे. ते जालन्यातील मंठा येथे पत्रकारांशी बोलत होते.
अतिवृष्टीच Heavy Rain अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे असंही ते म्हणाले. केवळ घोषणा करायच्या आणि पीकविमा कंपन्यांना मोकाट सोडायचं असं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसह राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यात मोठे अधिकारी देखील सहभागी आहे.पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य यात सहभागी असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटलंय.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.