सचिन कदम, रायगड प्रतिनिधी
Local Body Elections in Raigad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. रायगडमध्ये भाजपचे भंडखोर दिलीप भोईर यांनी शिवसनेते प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये भोईर यांनी धनुष्यबाण उचलला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप भोईर यांनी तिकिट न मिळाल्यामुळे बंडखोरी केली होती. भोईर हे शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते. विधानसभा निवडणुकीत भोईर यांचा पराभव झाला होता. बंडखोरी केल्यामुळे दिलीप भोईर यांच्यावर भाजपने कारवाई केली होती. आता दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग येथे एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत ३३ हजार मतं मिळवली होती. "भोईर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला."
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्याबाबत रायगडमध्ये शिवसेनेत दोन प्रवाह पहायला मिळतात. तिन्ही पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी मांडली आहे. मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य थांबवावीत अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला वेगळी व्यूहरचना करावी लागेल, असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.