BJP and AIMIM leaders together during the committee chairman election in Achalpur Municipal Council Saam Tv
महाराष्ट्र

दुतोंडी कृती, एमआयएमसोबत युती? भाजपचा एमआयएमसोबत घरोबा?

Achalpur Political Shock: हिंदूत्ववादाचा नारा देणाऱ्या भाजपनं आता सत्तेसाठी एमआयएमशी युती केलीय.. मात्र ही युती कुठं केलीय.. आणि त्याचे कसे पडसाद उमटलेत..

Bharat Mohalkar

राजकारणात काहीही घडू शकतं... हे आम्ही म्हणतोय..कारण हिंदूत्ववादी भूमिका घेणाऱ्या भाजपनं सत्तेसाठी चक्क एमआयएमशी युती केल्याचं समोर आलंय.. हा फोटो नीट पाहा... आता अकोटनंतर भाजपनं अचलपूर नगरपरिषदेतही एमआयएमशी घरोबा केलाय... आणि त्यामागचं कारण आहे विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक... सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी भाजपनं धक्कादायक रणनीती आखली..काय आहे ही रणनीती ..

अचलपूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी भाजपच्या रुपाली माथने विजयी झाल्या.. तर नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे 15, भाजपचे 9, एमआयएम 3, प्रहार- 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि 10 अपक्षांचा विजय झाला.. त्यामुळे भाजपच्या सत्तेचं गणित बिघडलं.. आता सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी भाजपनं एमआयएमचे 3, अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोबत घेत महिला बालकल्याण समिती पदरात पाडून घेतली..

तर एमआयएमलाही शिक्षण आणि क्रीडा सभापतीपद देण्यात आलंय.. हे सगळं घडलं असताना भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण तायडेंनी मात्र कानावर हात ठेवलेत.. विचारधारेशी तडजोड नाही... अशी वक्तव्य भाजप आणि एमआयएमचे नेते करत होते.. मात्र सत्तेपुढं विचारधारा क्षुल्लक असते हेच आजच्या युतीतून दिसून आलंय... त्यामुळे जनतेला नैतिकचे डोस पाजणाऱ्या आणि सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी जनतेच्या मतांशी खेळ करणाऱ्यांना मतदारांनी आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

Abhishek Sharma: जे करायचंय ते करा...! भारत-पाक सामन्यापूर्वीच माजी पाकिस्तानी खेळाडूची अभिषेक शर्मावर टीका

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार - जयकुमार गोरे

O Romeo Collection : 'व्हॅलेंटाईन डे'ला 'ओ रोमियो' चित्रपट हाउसफुल; २ दिवसांत केली 'इतक्या' कोटींची बक्कळ कमाई

O Romeo OTT Release : घरबसल्या पाहा शाहिद कपूरचा 'ओ रोमियो'; रोमँटिक डेटसाठी परफेक्ट Movie, वाचा ओटीटी अपडेट

SCROLL FOR NEXT