Abdul Sattr लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात; सत्तार यांचा दावा

एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही ते महाविकास आघाडीतील नेते ठरवतील - सत्तार

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते जालन्यात बोलत होते. काल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 नाराज आमदार भाजपच्या (BJP) संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना अब्दुल सत्तर (Abdul Sattar) म्हणाले की, भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये. दानवे खोटं बोलत आहेत उलट भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.

हे देखील पहा -

दानवे यांचा गौप्यस्फोट म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा असल्याचं सांगत सत्तार यांनी दानवे यांची खिल्ली उडवली. आज जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही, याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख नेते घेतील अशी माहितीही सत्तार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT