Sharad Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

'OBC आरक्षण जाण्याच्या कटकारस्थानात शरद पवार', भाजप नेत्याचा गंभीर आरोप

ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये शाब्दीक चकमकी सुरु आहेत.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये शाब्दीक चकमकी सुरु आहेत. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षणाच अंत्यंत महत्वाचे मानले जात आहे. मध्य प्रदेश सरकारने इम्पिरिकल डेटा (Empirical data) सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनेही इम्पिरिकल डेटा तयार करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवावे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे माजी मंत्री अनिले बोंडे (Anil Bonde) यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षण जाण्याच्या कटात शरद पवार आहेत, असा गंभीर आरोप बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

ओबीसी आरक्षणावर माध्यमांशी बोलताना बोंडे म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे ओबीसी आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षण जाण्याच्या कटात शरद पवार आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण जाण्यामागे मोठं कटकारस्थान आहे आणि या कटकारस्थानामागे शरद पवार आहे. आज भाजपच्या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय.ही दडपशाही खपवून घेणार नाही,असंही अनिल बोंडे म्हणाले.

दरम्यान, ओबीसी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक इम्पिरिकल डेटा मे महिन्याच्या अखेर पर्यंत तयार केला जाणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तो न्यायलयात सादर करणार आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या समर्पित आयोगाच्या जयंत बांठिया समितीकडून इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरु आहे. महापालिकांची प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय १४ महापालिकांना ३१ मे रोजी प्रभागनिहाय महिला प्रवर्गाची आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT