वाळवा तालुक्यात गव्याची दहशत; दोन दिवसात तिघांवर हल्ले! SaamTvNews
महाराष्ट्र

वाळवा तालुक्यात गव्याची दहशत; दोन दिवसात तिघांवर हल्ले!

शेतकऱ्यांनी गवा आलेल्या परीसरात एकटे न जाता बरोबर कोणाला तरी घेऊन जावे व काळजी घ्यावी, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या वाळवा (Walva) तालुक्यात गव्याची दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसात तिघांवर गव्याने (Indian Bison) हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वारणा काठावर उसाचे मोठे क्षेत्र आहे. याच उसात गव्याने दहशत माजवली आहे. शेतकऱ्यांवर उसाच्या फडात लपून बसलेले गवा हा हल्ला करू लागला आहे. नुकतेच येलूरमध्ये गव्याने हल्ला करून दोघांना जखमी केले होते. त्याच्या पाठोपाठ आज ऐतवढे खुर्द येथे गव्याने हल्ला करून शिवाजी पाटील या शेतकऱ्यास किरकोळ जखमी केले आहे.

हे देखील पहा :

वनविभाग (Forest Department) एखाद्याचा जीव गेल्यानंतर याचा बंदोबस्त करणार काय असा नागरिकांतून सूर उमटत आहे. ऐतवडे खुर्द येथील शेत वस्तीकडे जाणाऱ्या मोळा पानंद वस्तीवर शिवाजी कोंडीबा पाटील हे नेहमीप्रमाणे वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण काढत असताना अचानक गव्याने  त्यांच्यावर हल्ला (Attack) चढवला. त्यांच्या माडींवर गव्याने जोरदार धडक दिल्याने ते खाली पडले आणि मोठ्याने ओरडले त्यामुळे वारणा नदीकाठी एकच आरडाओरड सुरु झाली. त्यावेळी त्यांनी  कसातरी पळ काढला.

याबाबत पोलीस पाटील  मोहन चांदणे यांनी वन विभागाशी संपर्क करून संबधीत घटनेची माहिती दिली वन विभागचे पथक घटनास्थळी भेट देऊन हल्ला झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली. शेतात काम करत असताना काळजी घ्यावी, वारणा पट्ट्यातील विशेषतः नदीकाठावरील शेतात गव्याचा वावर वाढला असून गवा आलेल्या मार्गाने परत निघून जातो. मात्र, काहीजण त्यांच्या मागावर थांबून ओरडतात त्याला दगड मारतात. त्यामुळे गवा बिथरल्या सारखे करतो आणि हल्ला करतो. संबधित शेतकऱ्यांनी (Farmers) गवा आलेल्या परीसरात एकटे न जाता बरोबर कोणाला तरी घेऊन जावे व काळजी घ्यावी, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Express Engine Fire : एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; स्मृतीस्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील मनपाच्या मल:निस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती

Nellore Accident: आजारी नातेवाईकाला भेटायला जाताना अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jewellery Cleaning: दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक; काही मिनिटांत चमचम करेल सोन्याचा हार

SCROLL FOR NEXT