bison 
महाराष्ट्र

गव्याची दहशत; गुळाचे सौदे ठप्प, १० कोटींची उलाढाल ठप्प (vdo पहा)

सांगली मार्केट यार्ड परिसरात जमावबंदीचा आदेश तहसीलदार डी.एस. कुंभार यांनी काढला आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली शहरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास गवा (bison) घुसला. हा गवा सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घुसल्याने एकच हाहाकार उडाला. सध्या हा परिसर नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. येथे तहसिलदारांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. दरम्यान गवा घुसल्याने आजचे गुळाचे सौदे सकाळी ११ वाजेपर्यंत तरी हाेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे साधारणतः दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. bison enters in sangli market yard

सांगली (sangli) शहरातील आसपास गेल्या दोन दिवसांपासून गवा (bison) फिरत आहे. आज पहाटेच्या सुमारास गवा शहरात दाखल झाला. हा गवा वाट काढत काढत सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात घुसला आहे. या गव्याला पाहण्यासाठी मार्केट यार्ड समोर बघ्यांची मोठी गर्दी झाली हाेती. दरम्यान नागरिकांना काेणतीही इजा हाेऊ नये आणि गव्याला पकडता यावे यासाठी सांगली मार्केट यार्ड परिसरात जमावबंदीचा आदेश तहसीलदार डी.एस. कुंभार यांनी काढला आहे.

सध्या घटनास्थळी पोलीस आणि वन अधिकारी प्राणी मित्र दाखल झाले आहेत. सर्वच मार्ग पत्र्याच्या साह्याने बंद करण्यात आले आहेत. गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व वन अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT