इलेक्ट्रिक कटरने झाड तोडताना बगळ्याच्या १५ पिल्लांचा मृत्यू, पक्षीप्रेमी संतापले अभिजीत सोनवणे
महाराष्ट्र

इलेक्ट्रिक कटरने झाड तोडताना बगळ्याच्या १५ पिल्लांचा मृत्यू, पक्षीप्रेमी संतापले

तब्बल 15 बगळे आणि पिल्लांचा मृत्यू झाल्याने वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून झाड तोडणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक - गंगापूररोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका झाडावर कुऱ्हाड चालवण्याच्या नादात, झाडावरच्या घरट्यांध्ये असलेल्या बगळ्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा जीव गेला आहे. तब्बल 15 बगळे आणि पिल्लांचा मृत्यू झाल्याने वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून झाड तोडणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Bird lovers are angry that 15 herons have died while cutting down a tree)

हे देखील पहा -

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका झाडाच्या फांद्या तोडायचा नावाखाली ठेकेदाराने सर्रास या झाडावर इलेक्ट्रिक कटर चालवलं. मात्र झाडाच्या फांद्या कोसळण्याबरोबरच झाडावर असलेल्या बगळ्यांचे घरटे एका मागून एक खाली पडू लागले. ठेकेदाराच्या या हलगर्जीपणात बगळ्यांचे पिल्लं आणि काही बगळे देखील मृत झाले आहेत. रस्त्यावर पडलेले बगळ्यांचे पिल्लं बघून काही नागरिकांनी हे पिल्लं उचलून बाजूला ठेवले आणि तात्काळ वनविभागाला फोन लावला. मात्र वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत अनेक बगळे आणि त्यांच्या पिल्लांचा तडफडून मृत्यू झाला होता. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी होते आहे.

दरम्यान वनविभागाने काही जखमी बगळ्यांना आणि त्यांच्या पिल्लांवर उपचार केला आहे. मात्र पक्षीप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या प्राशासनाने ठेकेदाराच्या या मनमानीकडे केलेली डोळेझाक या बगळ्यांच्या आणि त्यांच्या पिल्लांच्या जीवावर बेतल्याने संताप व्यक्त होतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

Miss Universe India 2025 : राजस्थानच्या सुंदरीने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT