गुजरातमधील भीषण एअर इंडिया अपघातानंतर संपूर्ण देश हादरला असून, त्यानंतर आता एअर इंडियाच्या प्रत्येक विमानाची कसून तपासणी सुरू आहे. कुठेही काही त्रुटी आढळल्यास फ्लाइट तातडीने रद्द करण्यात येत आहे. मात्र, एअर इंडियाच्या विमानाला पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी पुण्याहून दिल्लीला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट तातडीने रद्द करण्यात आली आहे. विमानाला पक्षी धडकल्याने फ्लाइट रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
एअरलाइनने आपल्या निवेदनात म्हटलं की, दिल्लीहून पु्ण्याच्या दिशेनं येत असताना एका पक्ष्याने विमानाला धडक दिली. पुण्यात विमान लँड केल्यानंतर याची माहिती समोर आली. २० जून रोजी पुण्याहून दिल्लीला जाणारे AI2470 हे विमान पक्षी धडकल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती एअरलाइनने दिली. या प्रकरणाची अभियांत्रिकी पथकाकडून सखोल चौकशी केली जात आहे.
अडकलेल्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही एअरलानने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास त्यांना परतफेड देण्यात येईल, अशी माहिती एअर लाइनने दिली आहे. तसेच प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
एअर इंडियाच्या ८ विमान उड्डाणे एकाचवेळी रद्द
एअर इंडियाने पुन्हा एकदा उड्डाणे रद्द केली आहेत. एअर लाइनने एकाचवेळी ८ इंटरनॅशनल आणि डॉमेस्टिक फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. यात चेन्नई ते दुबई, दिल्ली ते मेलबर्न, हैदराबाद ते मुंबई आणि अहमदाबाद ते दिल्ली या विमानांचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना एअर इंडियाने सांगितलं की, देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे या उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.