Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Bike Taxi : फडणवीस सरकारचा ‘बाईक टॅक्सी’चा मोठा निर्णय, कोण कोणत्या शहरात धावणार?

Bike Taxi Services : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता ‘बाईक टॅक्सी’ धावणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाईक टॅक्सीच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Bike Taxi Services to Roll Out in Maharashtra : राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

रस्त्यावरील वाहन संख्या कमी होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालासुद्धा शासनाने मान्यता दिली आहे. अशा वाहनांना मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्यता प्रमाणपत्र, विधीग्राह्य परवाना व विमा संरक्षण बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सीच्या प्रवासी भाड्याचे दर हे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे सुनिश्चित करण्यात येतील.

बाईक टॅक्सीमुळे कमी खर्चात प्रवासासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे. या धोरणातंर्गत केवळ परिवहन संवर्गातील इलेक्ट्रीक बाईक टॅक्सीच धावणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाचा पर्यायासह ‘लास्ट माईल कनेक्टीव्हीटी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे.

तसेच शहरातील प्रदूषण व वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार असून नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. केवळ २० ते ५० वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देता येणार आहे. तसेच यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

SCROLL FOR NEXT