Ajit Pawar : अजितदादा बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंची दांडी, बीडचं राजकारण पुन्हा तापले | VIDEO

Ajit Pawar In Beed : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याकडे धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे बीडच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.
Ajit Pawar
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी सात वाजता अजित पवार यांचे बीडमध्ये आगमन झाले. हेलिकॉप्टरने अजितदादांचे आगमन होताच, कार्यकर्त्यांनी हेलीपॅडकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांना हेलीपॅडपर्यंत आलेले पाहून अजितदादा संतापले. त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतलीच, त्याशिवाय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही चांगलेच झापले. अजित पवार यांच्या स्वागताला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते, त्यामुळे बीडमध्ये राजकीय चर्चेने जोर धरला.

पाकमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडमध्ये असणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी घेणार आहेत. युवक मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज बीडमध्ये काही पक्षप्रवेश होणार असल्याचेही समजतेय. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी राष्ट्रवादीतील अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांन मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे दादांची भेट घेणार का? याची चर्चा सुरू होती.

Ajit Pawar
Pune Crime : मावळ हादरलं, अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी बीड शहरात मोठमोठे फ्लेक्स लागले आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या यशवंतराव नाट्यगृह येथे युवकांचा संवाद मिळावा आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील होणार आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा बीडमध्ये येत असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Ajit Pawar
Buldhana Accident : एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये कारचा चेंदामेंदा, ५ जण जागीच ठार, २३ जखमी

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक होणार आहे, या बैठकीसाठी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, भाजपा आमदार सुरेश धस, भाजपा आमदार नमिता मुंदडा, आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आमदार विजयसिंह पंडित हे लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. धनंजय मुंडे या बैठकीला येण्याची शक्यता नाही असे सूत्रांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com