Bihar Accident News Saam TV
महाराष्ट्र

Bihar Accident News: झोपेची एक डुलकी कायमचं झोपवून गेली; थरारक अपघातात कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Bihar News:

बिहारच्या रोहतास येथून अपघाताची मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. चारचाकी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील ७ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. अपघातात चार जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मृत व्यक्ती झारखंड येथील आहेत. झारखंड येथून त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रवास सुरू केला. शिवसागरमध्ये वाहन पोहचले तेव्हा कार चालकाला डुलकी लागली. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने कार थेट समोर असलेल्या मोठ्या ट्रकवर आदळली.

कार फार भरधाव वेगात होती. त्यामुळे ट्रकवर बसलेल्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी ४ जण जखमी असल्याचे समजताच त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र तरी देखील व्यक्ती हे नियम सर्रास धाब्यावर बसवतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT