अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
BJP leader defected to Shiv Sena before Jalna municipal elections : जालन्यात मतदानाच्या तीन दिवस अगोदर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य असलेले सुनील आर्दड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा जोरदार धक्का मानला जातोय. जालन्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असून प्रचार शिगेला पोहचला असतांना अर्जुन खोतकरांनी ऐनवेळी खेळी केल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय.
माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार संजना जाधव यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितित आर्दड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान भाजपाने एका एका घरात दोन दोन जणांना उमेदवारी देत घराणेशाही केली असून निष्ठावंताना डावलल असल्याच्या आरोप करत स्वतःच्या च पक्षावर खापर फोडून आपली नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर आज सुनील आर्दड शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने माजी नगराध्यक्ष यांच्या सह काही विद्यमान नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवल्याने नाराजीचा सुरु पाहायला मिळत होता.त्यामुळे भाजपचे निष्ठावंत प्रचंड प्रमाणात नाराज होते, जालना शहराचे माजी नगराध्यक्ष सुनील बापू आर्दड यांची देखील उमेदवारी भाजपाने नाकारल्यानंतर त्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.