Uddhav Thackeray And Aditya Thackeray Saam TV
महाराष्ट्र

बनावट शपथपत्र प्रकरणी क्राईम ब्रँचकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा

राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे -

अहमदनगर: राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर मुंबईच्या निर्मलनगर पोलिस ठाण्यात (Nirmalnagar Police Station) या बनावट शपथपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) दोन अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस कोपरगावमध्ये ठाण मांडून होते. या सर्व चौकशीत ठाकरे गटाला दिलासा मिळाल्याचे दिसून येतं आहे.

पाहा व्हिडीओ -

कोपरगावमधील २०० शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग झाल्यानंतर दोन अधिकाऱ्यांचे पथक कोपरगावमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने २०० जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली असता शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप ‌यांनी सांगितलं आहे.

तर ही शपथपत्रे आम्ही स्वत : दिली असुन सरकार आता ED प्रमाणे क्राईम ब्रांचच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे आणि शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी केलाय.

आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक (Shivsainik) आहोत, कोणत्याही दबावतंत्राला आम्ही घाबरत नाही. शिंदे सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच (Uddhav Thackeray) असल्याचे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतर कोपगावमध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळताना दिसतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट शपथपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंतिम अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT