Alibaug-Virar Corridor saam tv
महाराष्ट्र

Virar- Alibaug Corridor: विरार ते अलिबाग प्रवास सुसाट, १४ पदरी कॉरिडोर ६ महामार्गांना जोडणार; भिवंडी अन् कल्याणमधील ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार

News Highway In Maharashtra: विरार- अलिबाग कॉरिडोर तयार केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुसाट होणार आहे. हा मार्ग १४ पदरी असणार असून ६ महामार्गावरून जाणार आहे. कोण कोणत्या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • विरार-अलिबाग कॉरिडोर तयार होणार

  • हा मार्ग १४ पदरी असणार आहे

  • कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारची मंजुरी

  • हा मार्ग ६ प्रमुख महामार्गांना जोडणार जाणार आहे

विरार आणि अलिबागमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. विरारवरून अलिबागला जाणं आता अधिक सोपं होणार आहे. हा प्रवास लवकरच सुसाट आणि आरामदायी होणार आहे. कारण विरार- अलिबाग कॉरिडोर तयार केला जाणार आहे. या कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा कॉरिडोर १०४ गावांमधून जाणार असून ६ महामार्गांना जोडला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा मार्ग १४ पदरी असणार आहे. या कॉरिडोरमुळे विरार ते अलिबाग प्रवास सुसाट होऊन प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांनी कमी होणार आहे.

८ तालुक्यामधून जाणार मार्ग -

विरार- अलिबाग मार्ग १२५.०६ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गासाठी ३१,७९३.४७ कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. हा कॉरिडोर वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यांमधून जाणार आहे. त्यामुळे याठिकाणावरून अलिबागला जाणं देखील अधिक सोपं होईल. महत्वाचे म्हणजे हा मार्ग १०४ गावांना जोडला जाणार आहे.

६ महामार्गांना जोडणार मार्ग -

विरार- अलिबाग कॉरिडोर ६ महामार्गांना जोडला जाणार आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्ग, मुंबई- आग्रा महामार्ग, कल्याण-मुरबाद-निर्मल महामार्ग, मुंबई-वडोदरा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्ग यांना हा कोरिडोर जोडला जाईल. विरार-अलिबाग कोरिडोरवर ९ इंटरचेंजेस बांधले जाणार आहेत. या कोरिडोरमुळे प्रवास सुसाट होईल आणि प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांनी कमी होईल.

२ टप्प्यात होणार कॉरिडोरचे काम -

त्याचसोबत मुंबई, कल्याण, भिवंडी, पनवेल या शहरांमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटेल. विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण करणार आहे. कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यामध्ये ९४.४१ किमीचा मार्ग तयार केला जाईल. हा पहिला टप्पा वसई तालुक्यातील नावघर येथून सुरू होईल तो पेण तालुक्यातील बलवलीपर्यंत असेल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. दुसरा टप्पा बलवली ते अलिबागपर्यंत असणार आहे. हा दुसरा टप्पा २९.९ किमींचा असेल.

१२० किमी वेगाने करता येणार प्रवास-

विरार-अलिबाग कॉरिडोरचे वैशिष्ट्ये म्हणजे हा मार्ग १४ पदरी असणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी दूरच अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल. या मार्गावर वाहनचालकांना ताशी १२० किमी वेगाने प्रवास करता येईल. या मार्गावर बसच्या वाहतुकीसाठी एक स्वतंत्र मार्गिका असेल. सायकल ट्रॅक आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ असणार आहे. त्यासोबतच या मार्गाखालून गॅस, पाणी आणि ऑप्टिकल फायबरच्या केबलची सोय केली जाणार आहे त्यामुळे या मार्गाला मल्टमॉडेल मार्ग म्हटले जाईल. हा मार्ग तयार होण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा मार्ग २०३० पर्यंत नागरिकांच्या सेवेत येईल असे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT