Alibaug Tourism : मन उधाण वाऱ्याचे...; समुद्र, किल्ला, मंदिरे, पाहा 'अलिबाग'जवळील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

Shreya Maskar

मुरुड जंजिरा

मुरुड-जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक अभेद्य सागरी किल्ला आहे. येथे तुम्ही हिवाळ्यात नक्की भेट द्या.

Murud Janjira | yandex

तोफा

मुरुड-जंजिरा किल्ला त्याच्या भक्कम तटबंदी, ५७२ तोफा आणि विशेषतः 'कलाल बांगडी' नावाच्या तोफेसाठी ओळखला जातो.

Murud Janjira | yandex

रामेश्वर मंदिर

अलिबागजवळच्या चौल गावात एक प्राचीन आणि सुंदर श्री रामेश्वर मंदिर आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे. आजूबाजूच्या परिसरात नारळी-पोफळीच्या बागा पाहायला मिळतात.

Temple | google

रेवदंडा किल्ला

रेवदंडा किल्ला पोर्तुगीजांनी बांधलेली मोठी तटबंदी, कुंडलिका नदी आणि समुद्राच्या संगमावर वसलेला आहे. येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

Fort | yandex

खांदेरी-उंदेरी किल्ले

खांदेरी-उंदेरी किल्ले हे मुंबईजवळ अरबी समुद्रात असलेले महत्त्वाचे जलदुर्ग आहेत, जे शिवाजी महाराजांनी सिद्दी आणि इंग्रजांना शह देण्यासाठी बांधले होते.

Fort | yandex

तोफांचे स्थान

उंदेरीवर तोफांचे स्थान आणि खांदेरीवरील लाईटहाऊस (दीपगृह) आहे. हे ठिकाण इतिहासातील महत्त्वाचे आहे.

Fort | yandex

मुरुड बीच

मुरुड बीच शांत वातावरण, स्वच्छ काळी वाळू, नारळाच्या झाडांची हिरवळ, जंजिरा किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि डॉल्फिन पाहण्याची संधी या सर्वांसाठी प्रसिद्ध आहे.

Fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Alibaug | yandex

NEXT : नारळाच्या बागा, पांढरी वाळू अन् कमी गर्दी; दापोलीतील 'या' समुद्रकिनारी घालवा जोडीदारासोबत निवांत वेळ

Dapoli Tourism | yandex
येथे क्लिक करा...