Shreya Maskar
आंजर्ले समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आहे. हा सुंदर, शांत आणि स्वच्छ किनारा आहे. पांढऱ्या वाळूसाठी, नारळाच्या बागांसाठी हा किनारा ओळखला जातो.
आंजर्ले समुद्रकिनारा जोग नदीच्या मुखाजवळ असल्यामुळे प्रसिद्ध आहे, जिथे नदी समुद्राला मिळते. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
आंजर्ले बीचजवळ पिकनिकसाठी कड्यावरचा गणपती मंदिर, सुवर्णदुर्ग किल्ला, हर्णै बीच, केळशी बीच, कडवळी धरण हे पिकनिक स्पॉट आहेत.
तुम्ही आंजर्ले बीचवर भन्नाट फोटोशूट करू शकता. तसेच येथे तुम्ही सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आंजर्ले समुद्रकिनाऱ्या आवर्जून भेट द्या. जोडीदारासोबत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
आंजर्ले बीचवर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेता येतो. उदा. बनाना बोट राईड , जेट स्कीइंग, पॅरासेलिंग तुम्ही येथे आयुष्यातील सुंदर क्षण जगाल.
आंजर्ले बीचवर खास करून सी-फूड आणि कोकणी जेवण मिळते. तसेच नारळाचे पदार्थ येथे गेल्यावर नक्की खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.