Kolhapur Tourism : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पन्हाळा किल्ल्याजवळील गड, 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

Shreya Maskar

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याच्या जवळच पावनगड किल्ला आहे, जो पन्हाळ्याच्या संरक्षणासाठी बांधलेला एक महत्त्वाचा जोडकिल्ला आहे.

fort | yandex=

पावनगड

पन्हाळा आणि पावनगड दोन्ही किल्ले एकाच डोंगररांगेत असून एका खिंडीने (रेडेघाट) वेगळे झाले आहेत.

fort | yandex

भक्कम तटबंदी

पावनगड त्याच्या मजबूत बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. बांधकामात वापरलेला काळा कुरुंद दगड त्याच्या भक्कम तटबंदीला खास टिकाऊपणा देतो. ज्यामुळे तो शत्रूंना भेदणे कठीण झाले होते.

fort | yandex

किल्ला कोणा बांधला?

पावनगड हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसऱ्याने बांधलेल्या १५ किल्ल्यांपैकी एक मानला जातो. पावनगडला मोठा ऐतिहासिक वारसा आहे.

fort | yandex

तुपाची विहीर

पावनगड किल्ल्यावर भक्कम तटबंदी, बुरुज , ऐतिहासिक मंदिरे आणि तुपाची विहीर आहे. अस बोले जाते की, तुपाची विहीरमध्ये पूर्वी रयतेकडून कर म्हणून गोळा केलेले तूप साठवून ठेवले जायचे. जेणेकरून ते औषधी गुणधर्मांनी युक्त होऊन जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी वापरता येईल.

fort | yandex

पर्यटन स्थळे

पावनगड किल्ल्याजवळ अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणे आहेत. उदा. जोतिबा मंदिर, राधानगरी धरण, विशाळगड, गगनबावडा

fort | yandex

ट्रेकिंग

पावनगड ट्रेकिंग करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. येते ट्रेकिंग करताना निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतील. जेथे तुम्ही फोटोशूट करू शकता.

fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | yandex

NEXT : जंगल ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घ्या, थंडीत 'या' ठिकाणाची सफर करा

Maharashtra Tourism | google
येथे क्लिक करा...