Shreya Maskar
प्रचितगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात, शृंगारपूर गावाजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
प्रचितगड चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलात वसलेला आहे आणि चार जिल्ह्यांच्या (रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर) सीमेवर आहे.
प्रचितगड हा सह्याद्रीच्या दुर्गम भागातील ऐतिहासिक किल्ला आहे. जो जंगल ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड किल्ला जिंकला होता. प्रचितगडला मोठा इतिहास आहे.
प्रचितगडावर जुने भैरव-भवानी मंदिर, विहिरी आणि तोफांचे अवशेष आढळतात, जे या गडाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे दर्शन घडवतात
प्रचितगड किल्ला (Prachitgad Fort) हा कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता.
पावसाळा आणि हिवाळ्यात तुम्ही येथे भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.