Shreya Maskar
तुम्ही हिवाळ्यात ट्रेकिंगचा प्लान करणार असाल तर सिंदोळा किल्ला बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही तुफान मजा-मस्ती करू शकता.
सिंदोळा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, माळशेज घाटाच्या माथ्यावर वसलेला आहे.
सिंदोळा किल्ला टेहळणीसाठी वापरला जाणारा छोटा पण ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. जिथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
सिंदोळा किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या माळशेज घाटातील व्यापारी मार्गांवर आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.
सिंदोळा किल्ला पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळच आहे आणि या किल्ल्यावरून धरणाचे विहंगम दृश्य दिसते, ज्यामुळे ट्रेकर्समध्ये तो लोकप्रिय आहे.
सिंदोळा किल्ल्याच्या डोंगरांवरून, विशेषतः रिज वॉक करताना, देवदांड्या, भोजगिरी, निमगिरी आणि हनुमंतगड यांसारख्या शिखरांचे विहंगम दृश्य दिसते. तुम्ही येथे फोटोशूट करू शकता.
सिंदोळा किल्ल्यावर प्रवेशद्वाराजवळ हनुमान आणि गणपतीची कातळ-कोरीव मूर्ती आढळते, तसेच येथे पाण्याची टाकी आणि तटबंदीचे अवशेषही आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.