Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळांना मोठा दिलासा! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ED ने न्यायालयात केलेली याचिका घेतली मागे

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांना मोठा दिलासा! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ED ने न्यायालयात केलेली याचिका घेतली मागे

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

Maharashtra Sadan Scam:

एक मोठी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात कळवले आहे. न्यायालयानेही याचिका मागे घेत असल्याची ईडीची मागणी केली मान्य केली आहे. असं असलं तरी मात्र भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्या विरोधातील याचिका कायम आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना २०१६ मध्ये झाली रोजी अटकही झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला होता. (Latest Marathi News)

या निर्णयाला ईडीने २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीने अजब दावा केला होता.

ईडीच्या या दाव्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केल होतं. तसेच याचिका नेमकी कशासाठी केली, हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने ईडीला वेळ दिला होता. यानंतर आता ईडीने याप्रकरणी याचिका मागे घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT