Chhatrapati Shivaji Maharaj Mahatya  Saamtv
महाराष्ट्र

Breaking News: राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवरायांवरील महानाट्याचा प्रयोग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj Mahanatya: राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ३ दिवस या महानाट्याचा प्रयोग होईल.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई|ता. २३ डिसेंबर २०२३

Maharashtra News:

राज्यभरातील शिवभक्तांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ३ दिवस या महानाट्याचा प्रयोग होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या राज्याशिषेक वर्षानिमित्त, २ जुन ते ६ जुन २०२४ या कालावधीत राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महानाट्याद्वारे सर्व जिल्ह्यातील जनसामान्य पर्यंत पोहचवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

४० कोटी रुपये खर्च करुन राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये हे महानाट्य दाखवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचाराचीं व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना, तरुण पिढीला समजावी, तसेच शिवरायांच्या अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी, यासाठी या महानाट्याचे नियोजन करण्याते आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवरायांवरील नेमके कोणते महानाट्य असेल हे सरकारने स्पष्ट केले नाही. जून २०२४ पर्यंत या महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. या महानाट्यासाठी त्या- त्या जिल्ह्यातील नामांकित व्यक्तींना बोलावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT