Samriddhi Highway Saam TV
महाराष्ट्र

16 Helipad On Samruddhi Highway: मोठा निर्णय! समृद्धी महामार्गावर 16 हेलिपॅड उभारणार, अपघातानंतर जखमींना मिळणार तात्काळ उपचार

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Priya More

Mumbai- Nagpur Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावर दर दोन दिवसांने भीषण अपघाताच्या घटना (Samriddhi Highway Accident) समोर येत आहेत. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेले तर अनेक जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) समृद्धी महामार्गाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर आता हेलिपॅड बांधण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर 16 ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात येणार आहे. महामंडळाने यासाठी आराखडा तयार केला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असेल. या हेलिपॅडचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात झाला किंवा इतर काही घटना घडल्यानंतर तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जखमींना तात्काळ योग्य उपचार मिळावेत यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. या हेलिपॅडमुळे एअर अ‍ॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं शक्य होणार आहे. यासंबंधीच्या निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भविष्यात या हेलिपॅडची संख्या वाढवून 22 वर नेण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कृती आराखड्याच्या माध्यमातून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. या महामार्गावरील अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महामार्गालगत प्रत्येक 30 किमी अंतरावर हॅलिपॅड उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महामार्गालगतच्या 16 विविध सेवा-सुविधांच्या योजनेत या हेलिपॅडला समावेश आहे. त्यानुसार हे 16 हेलिपॅड बांधण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT