नागपूरमध्ये मोठ्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या  SaamTv
महाराष्ट्र

नागपूरमध्ये मोठ्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या

नागपूरच्या खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगावमध्ये मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची चाकूने वार करत हत्या केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : नागपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये परिवारातील आपसी कलहातून हत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव अधिकच गडद बनत चालले आहे. माणूस माणुसकी विसरून क्षणाचाही विचार न करता टोकाची पावले टाकत आपल्याच रक्तामांसाच्या, परिवारातील सदस्यांना संपवत असल्याची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. Big brother brutally kills younger brother in Nagpur

हे देखील पहा -

या हत्या सत्रांमध्ये नागपूर ग्रामीण मध्ये आज एक नवीन धक्कादायक प्रकार घडून आला आहे. नागपूरच्या खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव मध्ये सख्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची चाकूने वार करत हत्या केली आहे. आरोपी सतीश मानकर आणि लहान भाऊ मृतक गितेश मानकर याच्यामध्ये नेहमी वाद होत होते.

मृतक गितेश मानकर याला दारूचे व्यसन होते. तसेच त्याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी तो नेहमी घरी तगादा लावत होता. पण ही गोष्ट मात्र आरोपी मोठ्या भावाला मान्य नव्हती. याच कारणावरून आज बारा वाजता त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर आरोपीने मृतक लहान भावाला एका खोलीत घेऊन गेला आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर चाकूने वार करून हत्या केली. आरोपी सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT