Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेत फुट सुरूच आहे. त्यातच आता आमदारांबरोबर खासदारही शिंदे गटात सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाजपने (BJP)ऑफर दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या पवित्र्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. अशातच पोलिसांनी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपुरातील बंगल्यासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. (Devendra Fadnavis Latest News)

एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केलं आहे. शिंदेंच्या बंडाने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही बातमी समजताच राज्यभरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक भावूक देखील झाल्याचं बघायला मिळालं.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, तर केंद्रात २ मंत्रिपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून (BJP) ही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आणखीच आक्रमक झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता आता कुठलाही अनूचित प्रकार घडून नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal News: मित्रानेच केला घात! पती ड्युटीवर जाताच पत्नीवर लैगिंक अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Petrol Diesel Rate (16th May 2024): महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वधारले की घसरले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Today's Marathi News Live : मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर महापालिका अलर्ट

Astrology Tips : सुखी- समाधानी आयुष्यासाठी घराच्या दारात काढा या रंगाचे स्वास्तिक

Maharashtra Rain Update: तापमान वाढलं! मुंबईकर पुन्हा घामाघूम होणार, नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

SCROLL FOR NEXT