Big Breaking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक! Saam tv news
महाराष्ट्र

Big Breaking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक!

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल तेरा तासाच्या चौकशीनंतर, आज रात्री एकच्या सुमारास ईडी (ED) कडून अटक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई, सुरज सावंत

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल तेरा तासाच्या चौकशीनंतर, आज मध्यरात्री ईडी (ED) कडून अटक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर गेली अनेक दिवस देशमुख हे गायब झाले होते. सोबतच याच काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले ते, परमवीर सिंग हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत.

मात्र, आज देशमुख हे बऱ्याच कालावधीनंतर माध्यमांसमोर आले व समन्सनुसार ईडीच्या चौकशीला देखील सामोरे गेले. काल दुपारी १२ पासूनच देशमुख यांची चौकशी सुरु होती. तब्बल तेरा तास हि चौकशी चालल्यानंतर ईडीकडून देशमुख यांना अखेर अटक झाली आहे. त्यामुळे येत्या काळात देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

आजच देशमुख यांनी खुले पत्र लिहीत परमवीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्रातून त्यांनी सचिन वाझे व परमवीर सिंग यांना लक्ष्य केले होते. तसेच मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला सामोरे जाऊन ईडीच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. तसेच हि चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती.

देशमुख यांच्यावर असलेल्या 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले असून ED ने त्यांना मंगळवारी रात्री १ च्या सुमारास अटक केली. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते.

या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने (ED) पाचवेळा समन्स देखील बजावले होते. त्यांची 4 कोटींची संपत्ती देखील जप्त करुन त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने अखेर सोमवारी सकाळी 11.50 ला अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.

दरम्यान, ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी देशमुख यांनी एक ट्विट केले त्यात त्यांनी ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. अखेर आज त्यांना ईडीने अटक केली. महाविकास आघाडीला हा मोठा झटका असल्याचे बोलले जाते. देशमुखांना उद्याच न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

देशमुख यांच्या ईडी चौकशीकडे संपुर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे दिवसाभरापासून लक्ष्य लागून होते. देशमुख यांना ईडीकडून झालेल्या अटकेनंतर राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापणार आहे, हे मात्र निश्चित.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT