संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी
hingoli ncp district chief joins ajit pawar camp : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. बुलढाणा, नगरनंतर हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी मोठा दणका दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मुंबईमध्ये घड्याळ बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान दिलीप चव्हाण हे आपल्या सोबतच आहेत असं मला वाटत होतं, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकच हशा पिकला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र हिंगोलीत राजकारण्यांची वेगळीच हालचाल सुरू आहे.कारण जिल्ह्यात तीन वेळा सलग विधानसभेचे काँग्रेसकडून नेतृत्व केलेले भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश घेतला तर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डझनभर कार्यकर्ते, नेते, नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण माजी उपनगराध्यक्ष नेहाल शेख, नगरसेवक,शेख शकील,आरिफ भगवान,बिरजू यादव यांच्या सह अनेकांचा समावेश आहे, हिंगोली शहरात पालिकेवर मागील पंधरा वर्षांपासून वर्चस्व असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला या पक्षप्रवेशामुळे मोठे खिंडार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला आता उमेदवारांचा स्वतः शोध घ्यावा लागतो की काय? असा प्रश्न या पक्षप्रवेशामुळे उपस्थित झाला आहे. कारण हिंगोली पालिकेवर सत्ता असलेल्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बोटावर मोजण्या इतके नगरसेवक आणि नेते शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता हिंगोली पालिकेत राजकीय समीकरणे देखील बदलणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.