sharad pawar news Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा हादरा; बडा नेता साथ सोडणार, पक्षही निश्चित झाला

Sharad Pawar News : पंढरपुरात शरद पवारांना मोठा हादरा बसला आहे. पंढरपुरातील बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार आहे.

Vishal Gangurde

पंढरपुरातील अनिल सावंत यांनी शरद पवार गटाची साथ सोडली

अनिल सावंत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

भगीरथ भालके देखील शिवसेनेत प्रवेश करणार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतरही राजकीय पक्षात नेत्यांचे प्रवेश सुरूच आहेत. बुलढाण्यानंतर आता पंढरपूरमधील एका बड्या नेत्याने शरद पवार गटाची साथ सोडली. पंढरपूरच्या मंगळवेढ्यातील नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्याने शरद पवार गटाला मोठा हादरला बसला आहे. या नेत्याच्या राजीनाम्याने स्थानिक पातळीवर घडामोडींना वेग आला आहे.

सोलापूरच्या पंढरपूर मंगळवेढ्यातील अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आहे. अनिल सावंत यांच्या निर्णयाने शरद पवार गटात मोठा धक्का बसला आहे. भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष आणि शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत . त्यांनी पंढरपुरात १२ एप्रिल रोजी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

अनिल सावंत यांनी 2024 मध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे हे साठेआड हजार मतांनी विजयी झाले होते. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतविभागणीमुळे भाजपचे आवताडे विजयी झाले होते.

भालके देखील शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेस पक्षाकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले भगीरथ भालके देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, भालके आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पंढरपुरात महाविकास आघाडीला डबल धक्के बसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT