BJP leaders join Eknath Shinde’s Shiv Sena in Nandurbar Saam tv marathi
महाराष्ट्र

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

Maharashtra Politics latest News : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

Namdeo Kumbhar

  • नंदुरबारमध्ये भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

  • माजी सरपंच योगेश मोरे, सुनील पवार आणि अनेक ग्रामस्थांचा यात समावेश आहे.

  • आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.

  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय.

सागर निकवाडे, नंदुरबार, साम टीव्ही प्रतिनिधी

BJP leaders join Eknath Shinde’s Shiv Sena in Nandurbar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला जोरदार धक्का बसाल आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नंदुरबारमध्ये भाजपला धक्का देण्यात आलाय. नंदुराबरमधील भाजपच्या शेकडो नेत्यांनी कमळाची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेतलेय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. या पक्ष प्रवेशामुळे निवडणुकीआधी शिवसेनेची ताकद वाढली. (Maharashtra politics latest updates on BJP and Shiv Sena)

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे भाजपला बधवारी खिंडार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा हस्ते शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उप तालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे.

येथील शिवसेना भवन, आमदार कार्यालयात शनिमांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उप तालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे गटात सुरू असलेल्या इन्कमिंग मुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखीच वाढणार आहे..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात ३ टप्प्यात निवडणुका होत आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचातीसाठी प्रचाराला सुरूवात झाली आहे. राज्यात सध्या आचारसंहिता लागली असून प्रत्येक पक्षाकडून आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे. निवडणुका जाहीर होताच नंदुरबारमध्ये भाजपला धक्का बसलाय. शेकडो कार्यकर्त्यांनी रामराम ठोकलाय. नंदराबरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचे स्थानिक सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह सामूहिक राजीनामे

Pune: महिला वकिलानं बलात्कार केल्याचा पुरुषाचा आरोप, कुठं-कुठं नेलं? तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Maharashtra Live News Update: रसायनी एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत भीषण आग

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा भर सभेत थेट उदय सामंत यांना फोन, टाळ्यांचा कडकडाट, नेमके काय घडले? नंतर गडबड..., VIDEO

Nashik Crime: मालेगाव पुन्हा हादरलं! १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT