Bhushan Gavai Saam Tv
महाराष्ट्र

Bhushan Gavai: भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ; नरेंद्र मोदी, दौप्रदी मुर्मु यांच्या उपस्थित पार पडला सोहळा

B.R.Gavai Took Oath As Chief Justice Of India: भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथविधी घेतली आहे. भूषण गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत.

Siddhi Hande

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. ते देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारणार आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई हे अनुसूचित जाती प्रवर्गातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. ते महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई हे पहिले बौद्ध सरन्यायाधीश असल्याने भारतीय न्यायव्यवस्थेचा व्यापक आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून नियुक्ती महत्त्वाची ठरत आहे.

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे, अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रोपती मृर्मु यांच्या हस्ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली.

भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतातच अमरावतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अमरावतीकरांनी फटाक्याची आतषबाजी करत एकमेकांना लाडू वाटप करत जल्लोष करण्यात आला, भूषण गवई यांच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, अमरावतीकर देशाच्या सर्वोच्च मोठ्या पदावर जातो याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया अमरावतीकरांनी यावेळी दिल्या. मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव अमरावतीत साजरा करण्यात आला

राष्ट्रपती भवनात भूषण गवई यांचा शपथविथी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी भूषण गवई यांना सरनान्याधीश पदाची शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. संविधान कलम १२४ (२) अंतर्गत नियुक्तीपत्रक काढले. यावर राष्ट्रपतींची शिक्कामोर्तब केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT