bhusawal wardha passenger
bhusawal wardha passenger saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Wardha Passenger : भुसावळ - वर्धा पॅसेंजर हाेणार सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

संजय जाधव

Bhusawal Wardha Passenger : गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ - वर्धा पॅसेंजर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेेवेत रुजू हाेणार आहे. ही पॅसेजर रेल्वे (passenger train) सुरू हाेणार असल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांना (passenger) आर्थिक दृष्ट्या लाभदायक होणार आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. आता हि पॅसेंजर सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पॅसेंजर असल्यामुळे प्रत्येक लहान स्थानकांवर ती थांबते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ती किफायती व सोयीस्कर असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली.

ही पॅसेंजर रेल्वे दररोज धावणार आहे. एकूण १० जनरल सिटींग (जनरल सिटींग) व दोन एसएलआर (सिटींग कम लगेज रक) असे एकुण १२ कोच राहतील. अधिसूचनेनुसार भुसावळ- वर्धा - भुसावळ ( 11121) ही ट्रेन भुसावळ येथून दुपारी ०२.३० वाजता सुटेल व शेगाव रेल्वे स्थानकावर दुपारी ०४.४५ वाजता पोहोचेल.

ही पॅसेंजर वर्धा रेल्वेस्थानकावर रात्री ०८.२६ वाजता पोहोचेल. तसेच वर्धा-भुसावळ-वर्धा ( 11122) पॅसेंजर वर्धा रेल्वेस्थानकावरून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल. शेगाव रेल्वेस्थानकावर ही ट्रेन पहाटे ०४. ४७ वाजता पोहचेल आणि शेवटी भुसावळ रेल्वेस्थानकावर रात्री ०७.२५ वाजता पोहोचेल. ही पॅसेजर सुरू झाल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या लाभदायक होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT