पवारांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन मुख्यमंत्री हजर, सेनेचे आमदार गैरहजर; रायगडमधील आघाडीची नाराजी उघड राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

पवारांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन मुख्यमंत्री हजर, सेनेचे आमदार गैरहजर; रायगडमधील आघाडीची नाराजी उघड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड: अलिबाग उसर येथे होत असलेल्या जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याकडे शिवसेनेच्या (Shivsena MLA) तिन्ही आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे हे महाविद्यालय असताना शिवसेना आमदारांनी गैरहजेरी लावणे यावरून पालकमंत्री आणि खासदार यांच्यावरील नाराजी समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उसर येथे 52 एकर जागेत जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारत आहे. यासाठी राज्य शासनाने 406 कोटी निधीही मंजूर करण्यात आला आहे. आज उसर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे ऑनलाईन तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे आमदार, शिवसेना पदाधिकारी कोणीच उपस्थित राहिले नाहींत.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन विद्यमान आमदार आहेत. काही दिवसापासुन शिवसेनेने पालकमंत्री हटाव भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष सुरू आहे. आजच्या भूमीपूजन कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील सर्वच आमदार यांची नावे टाकली असून आमंत्रणही देण्यात आली होती. मात्र आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे या तिघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील कटुता दिसली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT