Bhiwandi Shocking x
महाराष्ट्र

Bhiwandi : धक्कादायक! शिर धडावेगळं केलं अन् खाडीत फेकलं, भिवंडीत आढळलं महिलेचं शिर

Bhiwandi Shocking : भिवंडी शहरातील ईदगार रोड येथे खाडी किनारी एका महिलेचे शिर आढळले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Yash Shirke

  • भिवंडीत खाडीकिनारी आढळले महिलेचे शिर

  • पोलिस तपास सुरु, परिसरात भीतीचे वातावरण

  • पोलिसांकडून तात्काळ तपासाला सुरुवात

फैय्याज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Bhiwandi News : भिवंडी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी शहरात एका खाडीच्या किनारी धड नसलेले महिलेचे शिर आढळून आले आहे. महिलेचे शिर आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील ईदगाह रोड येथील खाडी किनारी महिलेचे शिर आढळून आले. घटनास्थळी भोईवाडा पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. पोलिसांनी धडावेगळे करण्यात आलेले महिलेचे शिर ताब्यात घेतले आणि फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले अशी माहिती समोर आली आहे.

महिलेची ओळख करुन तिची हत्या कोणी केली? आणि का केली? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे. महिलेचे शिर कोठून खाडीपात्रात वाहून आले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. खाडीत धडावेगळे असलेले शिर आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खडकवासला धरण परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुणे-पानशेत रस्त्यालगत असलेल्या सोनापूर गावाजवळीत नदीपात्रामध्ये काल (२९ ऑगस्ट) रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. अचानक पाण्यात मृतदेह आढळून आल्याने पसिरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT