Bhimathdi Horses Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Breaking News: भीमथडी अश्वांना स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता, मराठा घोडदळात बजावलेय महत्त्वाची भूमिका

Maharashtra Breaking News: मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. या संदर्भात नुकतीच राजपत्रीय अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Breaking News

मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. या संदर्भात नुकतीच राजपत्रीय अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे आता अनेक वर्षे भीमथडी अश्वांचा प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा मिळाला असल्याची घोषणा अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे व बारामती अश्वपागेचे संस्थापक रणजीत पवार आणि बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता यांनी केली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २० व २१ जानेवारी रोजी बारामतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यात भीमथडी अश्व प्रजातीचा पहिला अधिकृत शो होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

पुणे, नगर, सातारा जिल्ह्यातील भीमा आणि निरा खोऱ्यात या जातीच्या घोड्यांची जोपसना केली जायची. येथून मराठा सैन्यासाठी घोडे पाठवले जात. घोड्यांची ही जात सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून या अश्वांना स्वतंत्र प्रजातीची मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केला जात होता. चपळ आणि वजन वाहून नेण्याची आणि कोणत्याही वातावरणात तग धरण्याची क्षमता अधिक असल्यामुळे त्यांना सैन्यात मोठी मागणी होती. पेशवे, मल्हारराव होळकर, शिंदेंच्या सैन्यात या अश्वाचा मोठा वापर केल्या जात असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. हिमालयातील पर्यटस्थळांवर याचा आजही वापर केला जातो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT