Amravati News 
महाराष्ट्र

Amravati News: संभाजी भिडेंच्या सभेच्या विरोधात भीम आर्मी आक्रमक; अमरावतीत कार्यकर्त्यांकडून पोस्टर फाडून घोषणाबाजी

Vishal Gangurde

अमर घटारे

Amaravati News: श्री शिवप्रतिष्ठानने संभाजी भिडे यांचे महाराष्ट्रातील विविध भागात कार्यकर्ता शिबीर आयोजित केले आहेत. संभाजी भिडे यांच्या या कार्यक्रमाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल वंचित बहुजन आघाडीने भिडे यांच्या नागपूरच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्यानंतर आता भीम आर्मीनेही अमरावतीमधील संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध दर्शवला आहे. (Latest Marathi News)

भीम आर्मी या संघटनेने अमरावती शहरात संभाजी भिंडे यांचा जोरदार विरोध केला. अमरावतीच्या नवाथे चौकात संभाजी भिंडे यांच्या विरोधात आंदोलन भीम आर्मीने जोरदार आंदोलन केलं. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिंडे यांच्या पोस्टरला चप्पल मारत बॅनर फाडले.

तसेच यावेळी संभाजी भिंडे यांच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी भीम आर्मीने केली. तर आज सायंकाळी ५ वाजता अमरावतीत संभाजी भिडे यांची सभा आहे. भीम आर्मीच्या विरोधानंतर संभाजी भिडे यांची ५ वाजता सभा होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नागपुरातही संभाजी भिडेंना जोरदार विरोध

नागपूरच्या गीता मंदिरमध्ये संभाजी भिडे यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. वंचित बहुजन आघाडीने संभाजी भिडे यांचा विरोध करण्याचा इशारा दिला होता. यामुळे शिबीर आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. (sambhaji bhide Latest News)

संभाजी भिडे कार्यक्रमस्थळी दाखल होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे यांचे समर्थक आमने-सामने आले. संभाजी भिडे यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणच्या बाहेर वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच संभाजी भिडेंना परत जाण्याची मागणी केली. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT