Bhim Army Vs MNS, Bhim Army Latest Marathi News
Bhim Army Vs MNS, Bhim Army Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंना तात्काळ अटक करा, अन्यथा संघर्ष अटळ; भीम आर्मीचा इशारा

विश्वभूषण लिमये

मुंबई : 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी सभेत आक्रमक भाषण केलं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. अशातच राज यांच्या सभेनंतर आता भीम आर्मीही (Bhim Army) आक्रमक झाली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस (Police) प्रशासनाने लवकरात लवकर अटळ करावी, अन्यथा त्यांच्यासोबत आमचा संघर्ष अटळ आहे अशी भूमिका भीम आर्मीने घेतली आहे. (Bhim Army Vs MNS News)

महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. या सभेनंतर राज ठाकरे हे जातीयवादी राजकारण करत असल्याच्या प्रतिक्रिया देखील काही नेत्यांनी दिल्या होत्या. तर, राज ठाकरेंनी खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. त्यातच आता भीम आर्मीनेही राज यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे. इतकंच नाही तर, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे जर महाराष्ट्रात दंगली घडल्या, तर आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता. मात्र, त्या अगोदरच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. परंतू एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा भीम आर्मी मनसे विरोधात भूमिका घेताना दिसून येत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT