Bhayandar Accident Saam tv
महाराष्ट्र

Bhayandar Accident : भरधाव कारने दोन रिक्षा, मोटारसायकलला उडविले; भाईंदर पूर्वमधील घटना, रिक्षातील प्रवाशी बचावले

Bhayandar News : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसल्याने बेजबाबदार वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे
भाईंदर
: भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाक्यावर भरधाव कार चालकाने दोन रिक्षा व एक मोटर सायकल स्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दोनजण जखमी झाले आहेत. सदरची घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली असून धडकेत दोन रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांकडून (Police) मुख्य महामार्गावर प्रमुख नाक्यांवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होताना दिसत आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलीस नसल्याने बेजबाबदार वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. दरम्यान सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास (Bhayandar) भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक नाक्यावर अशीच एक घटना समोर आली आहे.

रिक्षातील प्रवाशी बचावले 
गोल्डन नेक्स्ट ते इंद्रलोक नाका या रस्त्यावर एक भरधाव चार चाकी वाहनांनी दोन रिक्षांना धडक दिली. यामध्ये दोन्ही रिक्षामध्ये प्रवासी होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. परंतु रिक्षा चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मनबोध सिंग नामक रिक्षा चालक याला किरकोळ दुखापत झाली असून नवघर पोलीस ठाण्यात संबंधित कारचालका विरोधात मोटर वाहन कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे; अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण धनावडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

SCROLL FOR NEXT